जळगाव – एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या प्रा. विजेता सिंग यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय उभारणीत सामाजिक कायदेशीर योगदान’ या विषयावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील राज भवनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी झालेल्या कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुस्तकाचे सहलेखक डाॅ. शर्मिला घुगे, डाॅ. भावेश भराड उपस्थित होते. राज्यपाल काेश्यारी यांनी लेखकांचे कार्यक्रमात कौतुक केले.