जळगाव (प्रतिनिधी) – जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्त साधून पृथ्वी आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जनसामान्यांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी पृथ्वी, पर्यावरण संवर्धन आणि भूजल व्यवस्थापन या मुद्यांवर आधारित राष्ट्रीयस्तरावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
या प्रश्नमंजुषेचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील उपयोजित भूविज्ञान विभाग आणि औरंगाबाद येथील असोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजिस्ट (जियोफोरम) यांनी संयुक्तपणे केले. या उपक्रमात भारतातील विविध राज्यामधील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या सर्वांना ई-प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सदर उपक्रमास डॉ वि. म. रोकडे, प्रा डॉ प. स. कुलकर्णी (औरंगाबाद) आणि श्री भावेश दिनू पाटील यांनी नियोजन केले. या उपक्रमाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरू डॉ वि.ल. माहेश्वरी प्र-कुलगुरू डॉ स.तु. इंगळे आणि असोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजिस्ट (जियो-फोरम), औरंगाबाद अध्यक्ष प्राचार्य डॉ उ.दि. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी आणि संशोधन विद्यार्थांनी सहकार्य केले अशी माहिती समन्वयक प्रा डॉ. स. ना. पाटील यांनी दिली.