जळगांव – विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये पंधरा दिवसीय समर कॅम्पचे आयोजन केल्या गेले . या कॅम्प मध्ये 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिरामध्ये खेळाडूंना बास्केटबॉल, कराटे, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, खोखो, मल्लखांब, मैदानी खेळ, क्रिकेट ,योगासन या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. या खेळाडूंना सिद्धार्थशिंदे, संतोष बडगुजर, नरेंद्र भोई, धीरज जावळे, शिल्पा मांडे ,वाल्मीक पाटील ,प्रवीण राव या प्रशिक्षकां मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. तर शेवटच्या दिवशी शाळेचे प्राचार्य गणेश पाटील , समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव तसेच क्रीडा विभाग प्रमुख मंजुषा भिडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टी-शर्ट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेचे प्राचार्य श्री गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्रीडा प्रशिक्षकांनी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.