जळगाव प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. अशात सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे हा धार्मिक मुद्दा बनला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिरसोली गावात याच कारणामुळे दोन गटात दंगल झाली. या प्रकरणात दाेन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी काही संशयितांना अटक केली आहे. जिल्ह्यात काही तालुके जातीय दंगलींसाठी संवेदनशील मानले जातात. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त वाढवला आहे.