जळगाव प्रतिनिधी – केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी २२ एप्रिल राेजी जळगाव जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणसह विविध मार्ग,उड्डाणपुलांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भाेळे व खासदार उन्मेष पाटील यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२०१५ मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जळगावात सुमारे १७०० काेटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले हाेते. त्यापैकी ४ हजार काेटींची कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यात जिल्ह्यातून जाणारे चिखली ते तरसाेद फाटा महामार्ग, शहरातून जाणारा महामार्ग, जळगाव ते भडगाव, जळगाव ते औरंगाबाद महामार्ग व उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश असल्याचे सांगितले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपचे सरचिटणीस मधुकर काटे, अरविंद देशमुख उपस्थित हाेते.