Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उल्हास स्नेहसंमेलन उत्साहात

by Divya Jalgaon Team
April 16, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उल्हास स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव – विद्यार्थ्यांचे कलागुण अधिक प्रगल्भतेने समोर यावे व त्यांच्या कौशल्याला चांगले व्यासपीठ लाभावे, या हेतूने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १३-०४-२०२२ रोजी उल्हास २0२२ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

उल्हास २0२२ च्या कल्चरल नाईटफ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत वारके (संचालक, ॠखचठ) हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार व तंत्रनिकेतनचे समन्वयक प्रा. दिपक झांबरे, त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्रा. हेमंत इंगळे (डीन अ‍ॅकॅडेमीक्स) प्रा. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर) प्रा. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. प्रशांत शिंपी, तसेच सर्व शाखांचे प्रमुख व महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. महाविद्यालयात झालेल्या घडामोडी व वेगवेगळ्या स्तरावर झालेली प्रगती याबद्दल सांगतांना त्यांनी ट्रेनिंग अँड प्लेप्लेसमेंट विभागाचे कौतुक केले. अधिक संख्येने विद्यार्थांचे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे त्यांनी पुढील वर्षाचा आराखडा सांगताना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्लेसमेंट या मुद्यावर भर दिला. कार्यक्रमामध्ये कलागुण सादर करणाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे सर्व कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना जिवनात यशस्वी व्हायच्या मॅनेजमेंट स्कीलबद्दल विस्तृत माहिती दिली. मनोरंजक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा मुद्दा पटवून दिला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर निर्णय क्षमता व व्यवस्थापन यांची सांगड महत्त्वाची असते, असे त्यांनी नमूद केले . तुमचे मार्ग तुम्हालाच शोधायचे आहे. पण काही सोप्या गोष्टीच आचरण केलं आणि निरर्थक गोष्टी टाळल्यास विचारांमध्ये प्रगल्भता येते. आत्मविश्वास वाढतो, चिकाटी वाढते. प्राधान्यक्रम ठरवा व नियोजन करा. डॉ. प्रशांत वारके यांनी समर्पक शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Share post
Tags: #Godawary college#Ulhas patil#गोदावरी अभियांत्रिकीEducation
Previous Post

शरदचंद्र पवार यांच्यासह राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचे जळगावात आगमन

Next Post

भागवत कथा सप्ताहाचे केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि “दाल परिवार” तर्फे आयोजन

Next Post
भागवत कथा सप्ताहाचे केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि “दाल परिवार” तर्फे आयोजन

भागवत कथा सप्ताहाचे केशवस्मृती सेवासंस्था समूह आणि "दाल परिवार" तर्फे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group