जळगाव – महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांचे जळगावात आगमन झाले असून महापौर जयश्री महाजन यांनी त्यांचे विमान तळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे यांचीही उपस्थिती होती.