अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात आज श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याचे मंदिराचे हे पहिलेच वर्ष होते. प्रतीकात्मक स्वरूपात बाल श्रीरामाचे पूजन आनंद डिगंबर महाले व त्यांच्या पत्नी सौ. स्वाती महाले यांनी केले.
पाना- फुलांनी सजवलेला पाळणा महाले दाम्पत्याने फुलांच्या दोरीने हलविला. त्यावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीरामाचा जोरदार जयघोष केला. श्री मंगळग्रह मंदिरात श्री शतचंडी महायज्ञ सुरू आहे. त्यासाठी उपस्थित पुरोहित मंडळींनी प्रभु श्रीरामचंद्राची आरती व पाळणा गीत म्हटले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त सौ जयश्री साबे तसेच विनोद अग्रवाल, चेतन सोनार यांच्यासह अनेक भाविक व सेवेकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य केशव पुराणिक यांनी केले. त्यांना सारंग पाठक, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य व तुषार दीक्षित यांनी सहकार्य केले.