पुणे वृत्तसंस्था – घराजवळ राहत असलेल्या एका कुटुंबातील मांजराचे पिल्लू सतत ओरडत असल्याने त्याचा राग येऊन एका महिलेने मांजराच्या डाेक्यात काठी मारून ठार केले. ही घटना पुण्यातील गाेखलेनगर परिसरात घडली.
याप्रकरणी शिल्पा नीळकंठ शिर्के (रा.गाेखलेनगर, पुणे) या महिलेविरोधात चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत गाठे यांनी पाेलिसांत तक्रार दिली. गाठे यांच्या घराजवळ शिल्पा शिर्के राहतात. गाठे यांच्याकडे ४ महिने वयाचे मांजराचे पिल्लू हाेते. हे पिल्लू सतत आवाज करत होते. घटनेच्या दिवशी पिल्लू शिर्के यांच्या घरात गेले हाेते. त्यामुळे पिल्लू नेण्यासाठी गाठे शिर्के यांच्या घरी गेले असता शिल्पा यांनी मांजराच्या डाेक्यात काठी घातली. यात त्याचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल हाेताच ती पसार झाली आहे.