जळगाव प्रतिनिधी – वीज कर्मचारी केबल जोडत असताना झालेल्या वादात एकाने तरुणास फायटरने मारहाण केली. ही घटना ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता इस्लामपुरा भागात घडली. सय्यद साजिद अली (वय ४६, रा. इस्लामपुरा) यांना मारहाण झाली आहे. वादात सय्यद साजिद यांना गफ्फार शेख सत्तार, हकीम भाई व हसीम शेख हकीम यांनी फायटरने मारहाण केली. यात साजिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.