जळगाव प्रतिनिधी – जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादीची मागणी
आगामी दिवसांमध्ये विविध सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात सद्यस्थितीत सुरू असलेले भारनियमन एप्रिल महिना पूर्ण होईपर्यंत करण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मुस्लीम समाजाचा पवित्र महिना रमजान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, परशुराम जयंती,महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सण उत्सव येत आहेत. त्यामुळे एप्रिल महिना पूर्ण होईपर्यंत भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीने केली अाहे. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, रिकू चौधरी, डॉ. रिजवान खाटीक, दिलीप माहेश्वरी, किरण राजपूत उपस्थित होते.
भारनियम करू नका
उन्हाळा सुरु असल्याने महावितरणतर्फे करण्यात येणारे भारनियमन सण, उत्सवांच्या काळात करण्यात येऊ नये,अशी मागणी शहरातील नागरिकांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बहुतांश नागरिकांचे रोजे असल्याने ते उकड्यात आपले कर्तव्य पार पाडत असतात. बऱ्याच वेळा तर ऐन रोजा सोडण्याच्या वेळी किंवा नमाज पठण वेळीच वीज नसते. उन्हाळ्याचे दिवस, रमजान महिना, श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती असे सणोत्सव लक्षात घेता नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी आरिफ देशमुख, अश्फाक मिर्झा, जाकीर पठाण, शरीफ बाबा, विजय निकम, अमजद पठाण, मजहर पठाण, रियाज बागवान, जकी अहमद, सैफ पिंजारी, मोहसिन भिस्ती यांनी केली आहे.