जळगाव – रायसोनी स्कूलसमोरील अयोध्या हाईटससमोरुन दुचाकी चोरुन नेणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
विनायक गणेश सोनवणे (वय ३०, रा. कोळीवाडा, वढोदा, ता. यावल) असे संशयिताचे नाव आहे. शुभम ईश्वरे यांची दुचाकी २ एप्रिल रोजी अयोध्या हाईटस समोरुन चोरीला गेली होती. त्या अपार्टमेंटमध्ये मजुरी करणाऱ्या विनायकने दुचाकी चोरल्याबाबत ईश्वर यांना संशय होता. त्या अनुषंगाने एमआयडीसीचे गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे यांनी विनायक याला ताब्यात घेतले. त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.