Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शंभू पाटील यांना ‘गिरणा गाैरव’ प्रदान

by Divya Jalgaon Team
April 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
शंभू पाटील यांना ‘गिरणा गाैरव’ प्रदान

जळगाव प्रतिनिधी – नाशिकच्या गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गिरणा गौरव’ पुरस्कार अत्यंत थाटात जल तज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांना प्रदान करण्यात आला. कवी कालिदास नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रामदास फुटाणे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आणि मान्यवर उपस्थित होते.

नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार पाटील यांना प्रदान करण्यात आला. गिरणा गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिला जातो. या वर्षांपासून तो नाट्यक्षेत्रातील रंगकर्मींना द्यायची सुरुवात शंभू पाटील यांच्यापासून करण्यात आली. या प्रसंगी कवी राजू देसले, कवी प्रकाश होळकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यापूर्वी हापुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडे, सिंधुताई सपकाळ, भवरलाल जैन, डॉ मोहन आगाशे, अॅड. उज्ज्वल निकम, रतनलाल. सी. बाफना, लेखक रंगनाथ पठारे आदी मान्यवरांना पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री छगन भुजबळ, राजन गवस, गुरू ठाकूर, नीलिमा मिश्रा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परिवर्तनच्या सर्जनशील उपक्रमामुळेच माझा सन्मान
गिरणा काठावरील कुवारखेडा गावच्या रंगकर्मीला मिळालेल्या या “गिरणा पुरस्कारा’चे मोल मला अधिक आहे. ज्या नदीच्या पाण्यावर माझं भरण पोषण झालं त्या नदीच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याच श्रेय परिवर्तन जळगाव परिवाराला आहे. परिवर्तनने केलेल्या सर्जनशील उपक्रमामुळेच आज माझा सन्मान झाला आहे अशी भावना रंगकर्मी शंभू पाटील यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

Share post
Tags: #Guardian Minister Chhagan Bhujbal#Poet Kalidas at the theater#Shambhu Patil#गिरणा गौरव प्रतिष्ठान
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ८ एप्रिल २०२२

Next Post

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Next Post
राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group