मेष:- तुम्ही कोणत्या ही गोष्टीचा ताण घेऊ नका. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार योग्य होत जाईल. तुम्ही तुमचं आत्मविश्वास गमवू नका. तसेच तुमचं रागाला सांभाळून सांभाळावे.
वृषभ:- जास्त विचार करू नये. व्यर्थ खर्च करू नये. वस्तूच जपण करावे. वेळेवर झोप करावे.
मिथुन:- मनाची चंचलता जाणवेल. योग्य तर्क लावता येईल. तब्येतीची वेळेवर काळजी घ्यावी. घरातील ज्येष्ठांचा मार्गदर्शन घयावे. अनाठायी खर्च होऊ शकतो.
कर्क:- फिरण्याचा योग जुळून येणार. कामात कुटूंबाची साथ मिळेल. मनातील राहिलेली ईच्छा पूर्ण होणार.
सिंह:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
कन्या:- भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
तूळ:-घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
वृश्चिक:- तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
धनू:- हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.
मकर:- नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
कुंभ:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
मीन:- कौटूंबिक जबाबदारी सांभाळून घावी. आपल्यात असणारी कलेला वेळ द्यावे. घरगुती वस्तूची खरेदी करण्यात येईल.