जळगाव प्रतिनिधी – दुकानात काम करणाऱ्या दोघांनी बनावट चावी तयार करुन दुकानातून एक लाख २० हजार ६० रुपयांचे खाद्यपदार्थ चोरले. चोरी करत असताना दुकानमालकाने एकाला पकडले तर दुसरा पळून गेला.
गोपाल काशिनाथ पलोड (वय ६५, रा. रिंगरोड परिसर) यांच्या दुकानात ही चोरी झाली. त्यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये भारत एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे अनिल भिकमचंद राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामावर होते. ५ रोजी दुकान बंद करून पलोड घरी गेले. यानंतर रात्री १०.४५ वाजता अनिल व समाधान यांनी बनावट चावीने दुकान उघडून त्यातील खाद्यपदार्थ एका मालवाहू रिक्षेत भरण्यास सुरुवात केली. या वेळी तेथुन जाणारे पतंजलीचे स्थानिक अधिकारी इकबाल यांच्या लक्षात हा प्रकार अाला असता त्यांनी पलोड यांच्या मुलास माहिती दिली.