जळगाव – जागतिक आरोग्य दिना निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे मोफत रक्त तपासणी व नेत्र रोग तपासणी शिबिर पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली असून या कार्यक्रमात एकूण 111 पोलीस बंधू व भगिनिंची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सह पोलीस अधीक्षक श्री गवळी , उप पोलीस अधीक्षक श्री गावित, प्रतिष्ठानचे आजीवन सदस्य डॉ राहुल मयुर, विभागीय केंद्राचे सदस्य प्रा.डी.पी पवार, डॉ रेणुका चव्हाण व सौ अंजली पाटील व पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा .डी .पी .पवार यांनी केली. यावेळी संपूर्ण जिल्ह्याच्या पोलीस बांधवांचे आरोग्य शिबीर घेवून त्यांना लागेल ती वैद्यकीय मदत करण्याचा मानस डॉ मयुर यांनी प्रतिष्ठान तर्फे जाहीर केला.
या शिबिराच्या नियोजनामध्ये ज्यांची प्रेरणा होती असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांचे आभार प्रतिष्ठान तर्फे मानण्यात आले. या वेळी प्रतिष्ठान चे विभागीय केंद्राचे सदस्य डॉ रेणुका चव्हाण यांनी सर्व पोलीस बांधवांचे डोळे तपासून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच आय ड्रॉप्स चे वाटप यावेळी करण्यात आले. तर मोफत रक्त तपासणी निपुण पथोलॉजी लॅबोरेटरी तर्फे करण्यात आली.