जळगाव प्रतिनिधी – भारतीय हवामान खात्याने येत्या ४८ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा इशारा दिला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
जळगाव शहराचे बुधवारचे कमाल तापमान ४४ अंश, तर किमान तापमान २६ अंश एवढे होते. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत किमान तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त आहे. सोबतच रात्रीच्या किमान तापमानात काहीशी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही स्थिती पाहता गुरुवारी आणि शुक्रवारी कमाल तापमान ४४, तर शनिवारी व रविवारी ते ४३ अंश एवढे असू शकते. बुधवारी देखील सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ होती. यानंतर दुपारी हे प्रमाण ३० टक्के होते.