मेष:- मनातील तुमची इच्छा पूर्ण होणार. मागील बाकी असणारी रक्कम तुम्हाला मिळेल. तुमच्या कार्यात कुटूंबाची साथ मिळेल. समाज कार्यात तुमचा सहभाग असणार.
वृषभ:- घरातील वस्तू खरेदी करण्याचा योग होणार. आजच दिवस वैवाहिक जीवनात सुख – समाधानी जाणार. महिला वर्ग नवीन कपडे खरेदी कराल.
मिथुन:- मनात येणारी विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. व्यावसायिक प्रगती होणार. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. इच्छा विरुद्ध काही गोष्टी कराव्या लागणार.
कर्क:- मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
सिंह:- तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.
कन्या:- आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.
तूळ:- कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
वृश्चिक:- स्व कर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.
धनू:- कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मकर:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.
कुंभ:- व्यर्थ कोणती ही चिंता करू नये. कला गुण जोपासण्याचा प्रयन्त करावे. शरीर कडे दुर्लक्ष करू नये. काही दुखल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मीन:- मित्रांसोबत फिरायचं योग लाभणार. नवीन गुंतवणूक करावे. जास्त विचार करू नये. कोणावर पटकन विश्वास करू नये.