जळगाव – राज्य सरकारने स्वस्तधान्य घेण्याकरिता शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक नुसारच धान्य देण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जळगाव जिल्हात कोरोनाचा वाढता प्रादुभावा मुळे स्वस्त धान्य घेण्याकरिता शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिकची सक्ती करू नये तसेच या काळात काही झाल्यास सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना पन्नास लाखाचा विमा देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वतीने महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली.
अडकमोल यांनी फडणवीसांना निळ्या रंगाची शाल व पुष्गुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. तसेच फडणवीसांनी ही बायोमेट्रिक सक्ती रद्द करण्याचे विचार केले जाण्याची आश्वासने दिली.