मुंबई (वृत्तसंस्था)- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानपरिषेदवर संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
विधानपरिषेदवर लवकरच
विधानपरिषेदवर लवकरच राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये एकनाथराव खडसे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अगदी आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे एकनाथराव खडसे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस केली जाणार आहे. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे. १७ ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालीही सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दुसरीकडे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काँग्रेसकडून सत्यजित तांबे, नसीम खान, रजनी पाटील आणि सचिन सावंत यांच्या नावांची शिफारस केली जाऊ शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, उत्तमराव जानकर या नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.