Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नोव्हेंबरपासून सरकारी मदरसे बंद करण्याचा आसाम सरकारने घेतला निर्णय

by Divya Jalgaon Team
October 14, 2020
in राष्ट्रीय
0
madarsa news

आसाम- आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून सर्व मदरसे बंद होतील अशी माहिती आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. सरकारी पैशांवर ‘कुराण’चं शिक्षण दिलं जाऊ शकत नाही असं माझं मत आहे, तसं असेल तर मग आपण बायबल आणि गीताही शिकवली पाहिजे असं त्यांनी  म्हटलं आहे. “आम्हाला समानता आणायची असेल तर ही प्रथा थांबवायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आला,”

नोव्हेंबरपासून आसाममधील सर्व सरकारी मदरसे  बंद केले जातील. सरकार लवकरच यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध करणार आहे,” अशी माहिती हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे.

तसेच ते म्हणाले की, “सर्व सरकारी मदरसांचं रुपांतर नियमित शाळांमध्ये केलं जाईल. काही प्रकरणांमध्ये शिक्षकांची सरकारी शाळेत बदली केली जाईल”.

हेमंत बिस्व सरमा यांनी

हेमंत बिस्व सरमा यांनी यावेळी मुस्लिम तरुणांनाकडून हिंदू तरुणींची होणारी फसवणूक यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “अनेक मुस्लिम मुलं हिंदू नावाने फेसबुकला फोटो पोस्ट करतात. फेसबुकवर मंदिरामधले आपले फोटो शेअर करतात. एकदा लग्न झालं की मुलीला तरुण आपल्या धर्मातील नसल्याचं लक्षात येतं. हे रितसर करण्यात आलेलं लग्न नसून विश्वासभंग आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच “राज्य सरकारने याप्रकरणी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच वर्षात स्वइच्छेने लग्न होतील आणि कोणाचाही फसवणूक होणार नाही याती काळजी राज्य सरकार घेणार आहे. फसवणूक करुन झालेल्या लग्नाविरोधात आम्ही लढा देत राहू”.

Share post
Tags: AasamAasam SarkarCloseMadarsa
Previous Post

जळगावात कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अपघात

Next Post

विधानपरिषदेवर एकनाथराव खडसेंना मिळणार संधी

Next Post
eknathrao Khadse news

विधानपरिषदेवर एकनाथराव खडसेंना मिळणार संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group