मुंबई – माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रार्थना स्थळे उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे, भाजपा यांनी महाराष्ट्रातील मंदिरं कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने महाराष्ट्र सरकारला विचारला. त्यासाठी आंदोलनंही केली. आता धार्मिक स्थळं दिवाळीनंतर उघडतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.राज्यातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील करोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून चर्चा करताना हे आदेश दिले. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आणि राज्य कृती गटाचे तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यामुळे सुरुवातीला शहरांत असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरला असला तरी आरोग्यविषयक खबरदारी घेतल्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत.
प्रार्थना स्थळे उघडण्याच्या बाबतीतही दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल. मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक नियमितपणे जातात, हा विषाणू ज्येष्ठ आणि सहव्याधी रुग्णांना अधिक धोकादायक असल्याने याबात अधिक काळजी घेऊन निर्णय घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून त्यांची सातत्याने चौकशी करा. त्यामुळे करोनाची दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, करोना रूग्णांवर उपचारासाठी उभारण्यात आलेल्या रूग्णालय,केंद्रातील सुविधा काढून टाकू नका. उलट आरोग्य सुविधांमधील त्रुटी दूर करा, वैद्यकीय यंत्रणेला प्रशिक्षित करा, विभागवार डॉक्टर्सचा आढावा घ्या, कर्मचारी कमी करू नका. थोडी विश्रांती द्याा पण तात्पुरत्या सुविधा कायमस्वरूपी होतील याकडे लक्ष द्याा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
अजून वाचा
दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, शिक्षणमंत्र्यांची माहिती