जळगाव –इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार- 2021 गौरवण्यात आल्याने यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नसीम अन्सारी यांनी पवित्र कुराण पठणाने केली. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. इकबाल शाह हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस यांनी प्रस्तावना केली. इकरा युनानी मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, इकरा डी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. सईदा वकील, इकरा बी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. इरफ़ान शेख, इकरा रेसिडंशियल पब्लिक स्कुल चे प्राचार्य काझी जमिरुद्दीन आणि शिक्षक़ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
डॉ.अब्दुल करीम सालार यांना इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फ़े निशाने तिब्ब देण्यात आले. सत्कार स्विकारताना अब्दुल करीम सालार यांनी सांगितले कि , मी कोणत्याही पुरस्काराचा हक्कदार नाही पण तुमच्या प्रेमाने मला पात्र बनवले आहे. तुम्ही माझ्यावर केलेल्या सत्करा बद्दल मी तुमचा आभारी आहे.लोकांच्या हृदयात राहणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. डॉ.इकबाल शाह यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सोसायटीचे डॉ.इकबाल शाह, अब्दुल अजीज सालार, इकरा युनानी मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, शिक्षक डॉ. नसिम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. एजाज शाह, डॉ. अनीस शेख, डॉ. नाजेमा खान, डॉ. समीना खान, डॉ. जाकीर खान, डॉ. सुमैय्या सालार, डॉ. गजाला अन्सारी, डॉ. मुजीब पिंजारी, अफ़जाल शेख, बाकिद देशमुख, आसिफ़ खान, मोह्सीन शेख, सय्यद मसुद अली, जावेद शेख, खालीद रजा, इरफ़ान सय्य्द, इमरान शेख, युसुफ़ पठान, नासीर पठान, रिजवान शेख, तनवीर शेख. इकरा डी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. सईदा वकील, शिक्षक रफ़ीक शेख, पठान कासीम, वसीम अख्तर, एजाज खान, आसमा शेख, नॉन टिचिंग स्टाफ़ इबराहीम शेख, अहेमद शेख. इकरा बी.ऍड. कॉलेज चे प्राचार्य प्रो. इरफ़ान शेख आणी शिक्षक प्रो. वि. टी. पठान, प्रो. वसीम शेख, प्रो. डॉ. इश्वर सोनगीरे, प्रो. निलोफ़र शेख, मो. साबीर कासार, रईस शेख, सय्यद मुखतार, मिर्जा जाहिद बेग. इकरा रेसिडंशियल पब्लिक स्कुल चे हेडमास्टर काझी जमिरुद्दीन आणि शिक्षक वसीम शेख, शेख शकिल, पठान वाजीद, मोहसीन खान, इश्तियाक अहेमद, दानीश अहेमद, सजीद खान, शफ़ीक अहेमद, अरिफ़ खान, जय्यान अहेमद, वसिम खान, इन्तेखाब आलम, युनुस पटेल उपस्थित होते.