जळगाव – फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचतर्फे कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा.डॉ. विजय माहेश्वरी यांचा मानपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सातवे कुलगुरू म्हणून प्रा.डॉ. विजय माहेश्वरी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त दिनांक 08 मार्च 2022 रोजी फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.म. सु. पगारे आणि सर्व सदस्यांनी कुलगुरूंचा मानपत्र देऊन सत्कार व अभिनंदन केले. कुलगुरूंच्या दालनात आयोजित या कार्यक्रमात मानपत्राचे वाचन प्रा.डॉ.म. सु. पगारे यांनी केले. विद्यापीठातील डॉ.आंबेडकर विचारधारा विभागातर्फे भारताचे संविधान हे पुस्तक देखील यावेळी भेट देण्यात आले.
यावेळी विद्यापीठातील फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचचे प्रा.डॉ.अनिल डोंगरे, प्रा.डॉ.अनिल चिकाटे, प्रा.डॉ.सुधीर भटकर, प्रा.डॉ.जितेंद्र नाईक, प्रा.डॉ.डी.एच.मोरे, प्रा.डॉ.राकेश रामटेके, प्रा.डॉ.एस.आर.थोरात, प्रा.डॉ.ए.जी.इंगळे, प्रा.डॉ.अजय सुरवाडे, प्रा.डॉ.रमेश सरदार, प्रा.डॉ.ए.जी.पुरी, प्रा.डॉ.आर.एस.शिरसाम, प्रा.डॉ.विशाल पराते, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.आर.आर.चव्हाण, प्रा.डॉ.अतुल बारेकर, प्रा.डॉ.उमेश गोगडीया, प्रा.डॉ.डी.जे.शिराळे, डॉ.विनोद निताळे, डॉ.विजय घोरपडे, डॉ.दिपक खरात, डॉ.मनोज इंगोले, डॉ.शांताराम तायडे, डॉ.कृष्णा संदाशिव, प्रा.सुबोध वाकोळे व महेश सुर्यवंशी उपस्थित होते.


