यावल प्रतिनिधी – कोरपावली तालुका यावल येथील पत्रकार फिरोज तडवी यांचे चिरंजीव खलील उर्फ राहुल तडवी यांची एक सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्चा वाढदिवसानिमित्त पुणे व चाळीसगाव या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक सहकार्य करून मदत करण्यात आली. तसेच ज्याठिकाणी नागरिकांची मदत करायला व्हावी तिथे वेळेत पोहचून त्यांना मदत ही करतात.
वाढदिवसानिमित्त हरिपुरा या दुर्गम भागातील पांढरी येथील वस्ती शाळेच्या विध्यार्थ्यांना गरीब आदिवासी मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी तडवी शकील इस्माईल, खलील उर्फ राहुल तडवी पत्रकार फिरोज तडवी ,मुमताज तडवी दाणेश तडवी ,दानिश पटेल , शाहरुख देशमुख , शाहरुख तडवी ,समीर पटेल , सोईफ तडवी ‘ आदि उपस्थित होते