जळगाव – पत्नीबद्दल मी काय लिहावे, कसे लिहावे हे सुचतच नाही. तिच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. घर कुटुंब सांभाळत, जीवाची पर्वा न करता कोविड काळात तिने केलेले कार्य जळगावकर कायम लक्षात ठेवतील अशी आहे. माझी अर्धांगिनी म्हणजे डॉ.सूमय्या शोएब शेख आज महिला दिनानिमित्त कोरोनाकाळात मी इकरा कोविड सेंटर मध्ये व्यस्त असताना तिने केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात व्यक्त होण्याचा हा लहानसा प्रयत्न.
देशात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. एकीकडे जगात कोरोना डोके वर काढत असताना जळगावात सेवा परमो धर्म: तत्वाला अनुसरून मी इकरा कोविड सेंटर मध्ये रुग्णाची सेवा करत राहिलो व मला पाठबळ म्हणून त्या कामाला लागल्या. कुटुंब, घरकामाचे उत्तम नियोजन सांभाळणाऱ्या डॉ. सूमय्या यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी इकरा कोविड सेंटर मध्ये प्रशासनासोबत उत्तम नियोजन केले. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र विविध उपाययोजना राबविल्या त्यामुळे तीचा माझ्या मनात सदैव आदर सन्मान असणारच व या महिला दिनी नाही तर प्रत्येक क्षणाला मी तिच्या पाठीशी असणार आहे.