जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तिक विद्यमाने जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या ‘ताल सुरनका मेल’ या दशरंगी कार्यक्रमाने रंगली. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम वादनाला जळगावकर रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ. अमृता प्रवीण मुंढे, डॉ. शिल्पा किरण बेंडाळे, अपर्णा भट, दीपिका चांदोरकर उपस्थितीत होते. ‘ताल सुरन का मेल’ या मैफिलच्या सुरवातीला प्रथमेश्वरा गणदीश्वरा ने झाली. अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनींनी शास्त्रीय गायनात राग बागेश्री गंधार गुरू नाम जो लागे सुखदायी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर झणी दृष्टी लागो हा अभंग सादर केला.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा यासह कृष्णपद ‘याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग’ ही गौळण सादर केली. ‘मोसो चैन नही आवेरी’ हे फ्युजन सादर करुन रसिकांना परमोच्च आनंदाची अनुभूती करून दिली. रागमाला ने मैफिल चांगलीच रंगली. व्होकल हार्मनीच्या आविष्कारात सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, ये राते ये मौसम नदी का किनारा, मेंदीच्या पानावर, पुकारता चला हूं में, जिना इसीका नाम है, पाहिले न मी तुला, राजा सारंगा, ताल सुरन का मेल सादर करून रसिकांची मने जिंकले. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी जळगावकरांनी अनुभवली.
संपूर्ण मैफिलला तबल्यावर साथ संगत कल्याण पांडे यांनी केले. अनुराधा राऊत व शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त करील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आले. गुरूवंदना श्रुती जोशी यांनी म्हटली. सूत्रसंचालन स्मिता झारे यांनी केले. चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी आभार मानले.