जळगाव – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेस आज अनुभुती आंतरराष्ट्रीय स्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २१ जिल्हे व १५ क्रिकेट क्लब सहभागी होत आहे. जळगांव येथे त्यातील ५ सामने आयोजित करण्याची जबाबदारी आहे.
जळगांव येथील या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योगपती सुहांस केमिकल चे संचालक श्री संदीप काबरा यांच्या शुभहस्ते व जैन इरगेशनचे मीडिया उपाध्यक्ष श्री अनिल जोशी, निवड समिती सदस्य श्री कैलाश पांडे, सामन्याचे पंच श्री विवेक केतकर व नरेश मकवाना यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगांव जिल्हा असोसिएशन चे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले.
आज रोजी झालेला पहिला सामना जालना जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरूद्ध जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या दरम्यान झाला नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करत जळगाव संघाने ५२.३ षटकात सर्व गडी बाद १३५ धावा केल्या त्यात साहिल गाईकर ५५ ,धवल हेमनानी २०, व कर्णधार राहुल निंभोरे १५ धवांचा समावेश होता जालना जिल्हा क्रिकेट संघातर्फे गोलंदाजी करतांना व्यंकटेश काणे व विकास सुम्मारे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. प्रतिउत्तरात जालना जिल्हा संघ ३१.३ षटकात सर्व गडी बाद १०८ धावाच करु शकला आणि जळगाव जिल्हा संघाने २७ धावांची आघाडी घेतली जळगांव तर्फे गोलंदाजीत धवल हेमननी ४ जितेंद्र पाटील ३ व राहुल निंभोरे याने १ गडी बाद केले. उद्या दुसऱ्या दिवसाचा खेळ बाकी असून त्यात काय निर्णय होईल हे बघावे लागेल. अर्थात जळगांव संघाने पहिल्या डावात महत्वपूर्ण अशी २७ धावांची आघाडी घेतली आहे