जळगाव प्रतिनिधी – जळगाव विश्व हिंदू परिषदेतर्फे कर्नाटकातील शिमोगा घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेबाबत राष्ट्रपतींना निवेदनही देण्यात आले. कर्नाटकमधील शिमोगा येथे विहिंपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. या वेळी विहिंप जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिन नारळे, श्रीराम बारी, बजरंग दलाचे राकेश लोहार, बंटी बाविस्कर, हरीश कोल्हे, समाधान पाटील, खंडू पवार, कैलास जोशी, जगदीश पाटील उपस्थित होते.