Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचा पल्लवी सावकारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

by Divya Jalgaon Team
February 25, 2022
in जळगाव, राजकीय
0
जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचा पल्लवी सावकारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

palvi sawkare

जळगाव – कुर्‍हे- वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांना कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्रतर्फे जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागातून या एकमेव महिला सदस्याचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडून प्रभावीपणे तडीस नेले. पाच वर्षात आपल्या गटात चांगल्या प्रकारे कामे करण्यात यश आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या सदस्यांकडून जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन राज्यभरातून कार्यरत असणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पाच सदस्यीय निवड समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन टॉपटेन पुरस्कार जाहीर केले आहे. या निवड समितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी कुर्‍हे- वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष जि. प. सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील व संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र २२ फेब्रुवारी रोजी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांना प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनचे यंदाचे पहिले वर्ष असून या पुरस्काराचे वितरण येत्या ५ मार्च रोजी अण्णाभाऊ सभागृह एअरपोर्टरोड येरवडा पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

Share post
Tags: #कुर्‍हे- वराडसिम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या#जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन#जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे#राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष जि. प. सदस्य पुरस्कार जाहीर
Previous Post

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

Next Post

विहिंपने शिमोगाच्या घटनेचा केला निषेध‎

Next Post
विहिंपने शिमोगाच्या घटनेचा केला निषेध‎

विहिंपने शिमोगाच्या घटनेचा केला निषेध‎

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group