जळगाव – स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशनच्या जळगांव जिल्हा समन्वयक पदी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू, रासेयो स्वयंसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश अशोक धनगर निवड करण्यात आली असून, नूकतेच त्यांना निवडपत्र प्राप्त झाले आहे. आकाश धनगर यांनी क्रिडा व सामाजिक क्षेत्रातील कार्य
खूप मोठे योगदान दिले आहे. तसेच स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन राष्ट्रीय पातळीवर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक या क्षेत्रात कार्य करत आहे.
स्टूडंट्स ऑलिंपिक असोसिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर (चोपडा), जिल्हा उपाध्यक्षा दिव्या भोसले (भडगाव) व जिल्हा सचिव योगेश चौधरी (यावल) यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष तेजस पाटील (यावल) यांनी त्यांची निवड केली आहे, या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.