जळगाव – शहरातील राजीव नगर परिसरात जुलै २०१७ मध्ये एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज एकाच परिवारातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात आरोपींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.तरुणाच्या खूनाप्रकरणी पाच जणांना जन्मठेप.
प्राप्त माहितीनुसार, अजय प्रल्हाद सकट (वय २२, रा. राजीव गांधी नगर) याने दिलेल्या फिर्यादीत , दि. १२ जुलै २०१७ रोजी त्याचा भाऊ राहुल सकट याचा पगार झालेला होता. त्यामुळे घरासमोर असलेल्या टेकडीजवळील पटांगणात जेवणासाठी गेलेला होता. त्यावेळी सत्यासिंग मायासिंग बावरी याने राहुलकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु राहुलने पैसे दिले नाहीत, म्हणून दोघांमध्ये शिवीगाळ झाली.तरुणाच्या खूनाप्रकरणी पाच जणांना जन्मठेप.
त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास सत्यासिंग बावरी व त्याचे भाऊ रवीसिंग बावरी, मलिंगसिंग बावरी, आई मालाबाई बावरी, पत्नी कालीबाई बावरी असे घरासमोर आले व त्यांनी शिवीगाळ करून राहुलला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी माझी आई माळसाबाईने विरोध केला असता सत्यासिंग व रवीसिंगने तिला भिंतीवर ढकलून दिले. त्यामुळे आईंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. यात मनोज नाणे, अरविंद पाटील, अजय सकट, योगेश जाधव, प्रत्यक्षदर्शी रमेश झेंडे, प्रवीण सोनवणे, म्हाळसाबाई सकट, चंद्रकांत हतांगडे, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. प्रविण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेढे, पीएसआय राजेश घोळवे, पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, डॉ.निखिल सैंदाणे यांचा समावेश होता.
तसेच याप्रकरणी अंतिम सुनवाई नंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जे. कट्यारे यांनी या खटल्यात पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना जन्मठेपेसह एक हजार रुपयाचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अतिरिक्त भोगावी लागणार आहे. विशेष म्हणजे पाचही आरोपी लावलेल्या प्रत्येक कलमात दोषी आढळलेले आहे. या प्रकरणी सरकार पक्षाकडून अॅड.केतन ढाके तर आरोपी पक्षाकडून अॅड.हेमंत सूर्यवंशी, अॅड.केदार भुसारी, अॅड. प्रवीण पांडे यांनी कामकाज बघितले.
अजून वाचा
लॉकडाऊनच्या काळात घरफोडी करण्याला अटक