जळगाव – भुसावळ येथे लॉकडाऊनच्या काळात दुकाने फोडून घरफोडी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील संशयीताकडून हजारो रूपयांचे मोबाईलचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून भुसावळ बाजारपेठी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हातील तो मुद्देमाल असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कोरोना आजाराच्या संसर्गामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्याने भुसावळ येथे दुकान चालु ठेवण्याचे आठवडयातील रविवार , सोमवार , बुधवार , शुक्रवार असे दिवस ठरवुन दिले होते. भुसावळ येथील खडका रोडला असलेल्या रजा टॉवर स्टार मोबाईल दुकानसुद्धा उघडण्यासाठी दुकान मालक आले. त्यांना दुकानाचे शटर व कुलप तोडलेले दिसले. दुकान उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, दुकानातील विविध कंपनीचे मोबाईल चार्जर, मोबाईल पॉवर बॅक, हेडफोन, ब्लयु टुथ, स्पिकर आदी सुमारे 59 हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात इसमाने चोरुन नेले.
याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीसांत भाग ५ गुरनं,६८१/2020 अन्वये भादंवि कलम 454,457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हाचा तपास बाजारपेठ पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालमत्ते संबंधी गुन्हे उघडकीस आणणे कामी पथके स्थापन केले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ. शरीफ काझी , युनुस शेख , किशोर राठोड, विनोद पाटील , रणजीत जाधव , मुरलीधर बारी अशाचे पथक स्थापन केले. वरील पथकास गोपनिय माहिती मिळाली की, भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील फिरोज शेख अखिल गवली हा सध्या भुसावळ शहरात चोरी घरफोडी चे गुन्हयात सक्रीय असुन लॉकडाऊन चे काळात त्याने दुकानांमध्ये घरफोडी चोऱ्या केलेल्या आहेत. पथकाने जाममोहल्ला भागात सापळा रचुन फिरोज शेख अखिल गवली या ताब्यात घेतले.
त्याला पोलीशी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दुकान फोडून घरफोडी करीत चोरी केल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेला मुद्देमालासह दुकानातील विवीध कंपनीचे मोबाईल चार्जर, मोबाईल पॉवर बँक हेडफोन, ब्लयु टुथ, स्पिकर इत्यादी काढुन दिले. त्याच्यावर पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन च्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.