जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व प्रशिक्षण शिबीरासाठी रासेयो स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण व निवड शिबीराचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले.
दि . २० ते २९ नोव्हेंबर २०२० दरम्यान अनुराग विद्यापीठ, हैदराबाद येथे पश्चिम विभागीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व निवड शिबीर होत असून, यासाठी कबचौउमविचा संघ निवडण्यासाठी प्रशिक्षण व निवड शिबीर घेण्यात आले . तिन्ही जिल्हयात मागील वर्षात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन शिबीरातील गुणवत्ताधारक स्वयंसेवकांमधून येथील निवड शिबीरासाठी संघ निवडण्यात आला .
यात सर्व सहभागी स्वयंसेकांची विद्यापीठाच्या आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत उंची व वजन मोजण्यात आले . त्यानंतर रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी सर्व सहभागी स्वयंसेवकांना निवड प्रक्रिया संदर्भात मागदर्शन केले . त्यानंतर सुभेदार सतिष कुमार यांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन नंतर शिबीर नियमानुसार निवड करण्यात आली . यासाठी डॉ. संतोष खिराडे , प्रा दिलवरसिंग वसावे, प्रा दिपक सोनवणे , आकाश धनगर, प्रज्वल बडगुजर आदींनी विशेष परिश्रम घेतले .