मुंबई वृत्तसंस्था – गायक व संगीतकार बप्पी लहरी यांच्या बुधवारी सकाळी एका हॉस्पिटल येथे निधन झाले असून त्यांच्या चाहत्यांसाठी ही बाब धक्का दायक ठरली. बप्पी लाहिडी हे ६९ वर्षांचे होते. बप्पी दा ला खूप सोनं घालायची सवय होती त्यामुळे त्यांना गोल्ड मॅन नावाची ओळख होती. काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे.
बप्पी लाहिरी 1970- 80 मध्ये त्याचे अनेक गाणे खूप फेमस झाले.आय एम डिस्को डान्सर आणि शराबी सारखे अनेक चित्रपट त्यांनी केले.
मागील वर्षी एप्रिल मध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ही दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना बप्पी दा लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना केली होती. त्याच्या असं जाण्याने फिल्म इंडस्ट्रीत मध्ये शोककला पसरली आहे.


