पिंपळगाव – शिंदाड जि. प. गटाचे तसेच विकास कामांचा धडाका सुरू ठेवणारे लोकप्रिय जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते ४८ लाखांच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन आज होत असून, परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच यांनी केले आहे.
पिंपळगाव हरेश्वर- शिंदाड जि.प. गटाचे सदस्य जनमाणसात कमी कालावधीत लोकप्रिय झालेले मधुकर काटे यांनी गटातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून, आज सातगाव डोंगरी येथील दलित वस्तीसुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, गटार, तसेच शौचालयासाठी २३ लाख रुपये तर पिंप्री ता. पाचोरा येथील दलित वस्तीसाठी रस्ता कॉंक्रिटीकरण व गटारीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे आज भूमिपूजन होत आहे. दोन्ही गावातील नागरिकांनी सकाळी पिंप्री येथे सकाळी नऊ वाजता तसेच सातगाव डोंगरी येथे दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहेत.