यावल प्रतिनिधी – तालुक्यातील सावखेडा-हिंगोणा जिल्हा परिषद गटातील लघु सिंचन विभागातर्फे सुरु असलेले आणि झालेल्या बंधाऱ्याच्या कामाची आणि थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संबंधितांची चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबविण्यात यावे अशी मागणी यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे.
दि.8फेब्रुवारी2022रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सावखेडा होणा-या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत चालू वर्षात बंधाऱ्याची कामे मंजूर होऊन ठेकेदारांमार्फत कामे पूर्ण झालेली आहेत तर काही कामे सुरू आहेत ही बंधाऱ्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने या नाल्यावर बंधारा बांधला जात आहे बेकायदा त्याचं नाल्यातील माती मिश्रित वाळू वापरून व त्याच भागातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरील दगड-गोटे गोळा करून वापरून नाला बांधकाम तीन ते चार दिवसात पूर्ण केले आहे.
याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगून तसेच आमच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत वेळोवेळी तक्रार करून सुद्धा संबंधित उपविभागीय अधिकारी शाखा अभियंता त्या कामाकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराचे बिल काढण्याबाबत ठेकेदारांना मदत करीत आहेत या सर्व झालेल्या बंधारे बांधकामाची गुण नियंत्रक विभागाकडून पडताळणी करण्यात यावी किंवा ज्या कोणी पार्टीने निकृष्ट झालेल्या बांधकामाचे कामाचे थर्ड पार्टी ऑडिट केले असेल आणि संबंधित ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी बिल काढले असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी केली आहे.
याच प्रमाणे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात ग्रामपंचायत क्षेत्रात खडीकरण,डांबरीकरण, गटारीचे बांधकाम,घरकुल इत्यादी सर्व कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने सदर कामे सुरू असताना संबंधित शाखा अभियंता कामा ठिकाणी प्रत्यक्ष व्हीजिट,भेटी न देता ठेकेदार त्यांच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार निकृष्ट प्रतीची कामे करून घेत आहेत


