मेष:- तुमचे नातेवाईक तुम्हाला भेटण्यासाठी येतील. त्यामुळे तुमचं वेळ कामात जाईल. तुमच्या फायद्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन तुम्हाला लाभणार.
वृषभ:- व्यवहार तुम्ही चागलं प्रकारे हाताळतील. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.
मिथुन:- चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.
कर्क:- दिवस स्वच्छंदीपणे घालवाल. अतिविचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.
सिंह:- छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.
कन्या:- जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.
तूळ:- नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात.
वृश्चिक:- तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल.
धनू:- आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल.
मकर:- शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.
कुंभ:- कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल.
मीन:- कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.