मुक्ताईनगर। भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप विषयी असलेली मनातील खदखद पुन्हा व्यक्त केली आहे. बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके हे माझ्यामुळे मोठे झाले. मात्र ते माझ्याच व्याह्याला खडसे यांना तिकिट मिळणार नसल्याचे सांगू लागले. म्हणजे हा कट आधी शिजवण्यात आला असून याची माहिती फडके यांना होती असे स्पष्ट आहे.डॉ. राजेंद्र फडकेंना कटाची कल्पना – एकनाथराव खडसे.
आपण आजवर कधीही भाजप विरूध्द भूमिका घेतली नाही. पक्षाच्या कुण्या नेत्यावर आरोप केले नाहीत. मात्र लढा हा एका व्यक्ती विरूध्द होता. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असतो… जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग अशा शब्दांमध्ये एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.डॉ. राजेंद्र फडकेंना कटाची कल्पना – एकनाथराव खडसे.
भाजपने नाथाभाऊंना खूप दिले असे म्हटले जात असले तरी आपण संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले. मुलगा गेला तरी न रडता पक्षासाठी उभा राहिलो…आणि आता हे मला अक्कल शिकवताय…जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग ? असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
तालुक्यातील कुर्हा-काकोडा येथील राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कुर्हा-काकोडा तसेच परिसरातील सुमारे तीनशे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, निवृत्ती पाटील, सुभाष पाटील, योगेश कोलते, मनीष गोयनका, रमेश खंडेलवाल, प्रकाश चौधरी, राजीव खंडेलवाल, शिवा पाटील, माणिक पाटील, वसंता पाटील, मयूर साठे, भागवत राठोड, सुशील भुते, गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.
अजून वाचा
शिवसेनेतर्फे केंद्राविरूद्ध भव्य दुचाकी मोर्चाचे नियोजन