जळगाव, प्रतिनिधी । आज बुधवार , दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता वाघ नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा (महानगर) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक सहसचिव संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान व कोरोना लसीकरण शिबीर राबविले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील होते तर कार्यक्रमाचे उदघाटन महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रविंद्र पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात १०० नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली व 50 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच वाघ नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष बाविस्कर, पूजा नावडे, वैशाली कदम यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक पाटिल , महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटिल, जिल्हा महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा महानगर सरचिटणीस सुनील माळी, रहीम तडवी, विशाल देशमुख, रमेश बहारे, सुशील शिंदे, शकीला तडवी, नईम खाटिक, जितेंद्र बागरे, सुहास चौधरी, नामदेव पाटिल, दिपक पाटिल, किरण चव्हाण, सिद्धार्थ गव्हाळे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वाघ नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.