चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड (लालबर्डी) येथे दिं. ९ रोजी जि.प. उच्च प्राथमिक शाळेला गरजू विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे या संस्थेचे गुणवंतजी सोनवणे यांच्या संकल्पनेतून ४३ स्कुल किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच श्री. प्रदीपराव भोसले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सेवा सहयोग ग्रामोद्य प्रकल्पाचे समन्वयक सोमनाथ माळी यांनी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या जलसंधारण,सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या मदतीबाबत तसेच ग्रामोद्य प्रकल्पाअतर्गत गरजू महीलासाठी सुरू असलेल्या शिवणकाम तसेच युवकांसाठी सुरू असलेल्या गँरेजप्रशिक्षण व रोजगार निर्मिती बाबत माहिती दिली तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहयोगचे राहुल राठोड, सौ.बागुल मॅडम,श्री तुफान खोत सर उपस्थित होते.याप्रकरणी गावाचे ग्रा.प सदस्य सिद्धार्थ मोरे, सजय ठूबे , भैय्या सूर्यवंशी, दीलफरोज शेख, व माजी सरपंच भिकण मुलमुले तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री सुनील जगताप तसेच गावातील युवा नितीन संसारे कपिल सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सम्राट सोनवणे व खैरे सर यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा पाटील यांनी आभार व्यक्त केले.या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी तालुक्यावर संस्थेचे चालू असलेल्या कामाबाबत मार्गदर्शन व चर्चा केली. गावातील राजकारण बाजूला ठेवून आपण गावाचा शैक्षणिक, सामाजिक,सर्वागीण विकास कसा करता येईल यावर मनोगत व्यक्त केले.