Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गौतम अदानी ठरले जगातील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्यधीश

by Divya Jalgaon Team
February 8, 2022
in राज्य
0
गौतम अदानी ठरले जगातील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्यधीश

मुंबई, वृत्तसंस्था । अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे.

बंदरे, विमानतळे,खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचे ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलेय. याचवेळी अंबानींची एकूण संपत्ती ही 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे.अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत.

अदानी समूहाच्या खाण प्रकल्पाला ऑस्ट्रेलियामध्ये मोठा विरोध झाला. तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गपासून अनेकांनी या खाण प्रकल्पांना विरोध केल्याने अदानी समूहाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली. मात्र अदानींनी केवळ खनिजांवर लक्ष केंद्रीत न करता हरित ऊर्जा क्षेत्रामध्येही काम केले. त्यांनी विमानतळ, डेटा सेंटर्स, शस्त्रनिर्मीती उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करुन वाटचाल सुरु ठेवली. हीच क्षेत्र देशाचे दिर्घकालीन आर्थिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्वाची असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा व्यक्त केलेय.

“अदानी समूहाने सर्व वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांना ओळखून त्यामध्ये योग्यवेळी प्रवेश केला. त्यामुळेच त्यांना परदेशी गुंतवणूकही मिळाली,” असे मत मुंबईमधील एचडीएफसी सिक्युरीटीज लिमिटेडचे दिपक जासानी यांनी व्यक्त केले. मागील दोनवर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत 600 टक्क्यांनी वाढली.2070 मध्ये भारताचे झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत असल्याने भविष्यातही अदानी समूहाला अच्छे दिन येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Share post
Previous Post

कुसुंबा येथे भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

Next Post

रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जळगावातील नियोजन भवनात झाली जनसुनावणी

Next Post
रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जळगावातील नियोजन भवनात झाली जनसुनावणी

रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जळगावातील नियोजन भवनात झाली जनसुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group