जळगाव, प्रतिनिधी । नशिराबाद गावातील प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने आज नशिराबाद नगर परीषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
नशिराबाद गावातील प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने आज गावातील अपंग बांधवांसाठी गेल्या दोन वर्षापासून कुठलाही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आज नशिराबाद नगरपरिषद मुख्य अधिकारी साहेब यांना 5% अपंग निधी लवकरात लवकर उपलब्ध करण्यात यावा, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मोहन माळी, शहर उपाध्यक्ष ईशार शेख, महिला शहराध्यक्ष वर्षा माळी, मयुरी टाकरे, आबीत भाई, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.