नवी दिल्ली : भारतात डिजिटल पेमेंट स्पेस विशेषतः यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये एक मोठा बदल येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी अधिकृत केले आहे की 1 जानेवारी, 2021 पासून एक नवीन कॅप लागू होणार आहे. यानुसार कोणताही थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सचा (TPAPs) यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या ट्रांजॅक्शनमधील वाटा 30% पेक्षा जास्त नसावा. यामुळे फोनपे, गूगल पे, पेटीएम आणि मोबिकविक, तसेच नव्याने लाँच झालेल्या व्हॉट्सअॅप पेसह अनेक कंपन्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. NCPI चा असा विश्वास आहे की याने यूपीआय इकोसिस्टीम संरक्षित राहील व त्यातील जोखिमा व्यवस्थित हाताळता येतील.यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मोठा बदल.
फोनपे सांगतं की ऑक्टोबरमध्ये त्यांच्या अॅपवर 925 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स केली गेली व सप्टेंबरच्या महिन्यात हा आकडा 750 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स इतका होता. या डिजिटल प्लॅटफॉर्मचे मोठे आकडे हे भारतातील टायर 2 आणि टायर 3 शहरातून आले आहेत जिथल्या युझर्सनी एकूण ट्रांजॅक्शन्स 70% पेक्षा जास्त केल्या आहेत. फोनपे सांगतो की त्यांनी ऑक्टोबर त्यांच्या अॅपवर 835 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स केलेल्या पहिल्या ज्या या महिन्याच्या एकूण यूपीआय ट्रांजॅक्शन्सचे 40% इतके शेअर आहे. NPCI च्या नोटिफिकेशनमधून एक गोष्ट स्पष्ट नाही झाली आहे, ती म्हणजे जर कोणतीही TPAP ट्रांजॅक्शन्सच्या बाबतीत दिलेल्या 30% कॅपच्या पुढे गेली तर काय होईल. “NPCI या संदर्भात लवकरच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जाहीर करणार आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या गुगल पे आणि फोनेपे यांची सुद्धा या बाबतची भूमिका स्पष्ट नाही. कारण येत्या वर्षात या नवीन कॅप मुळे सर्वाधिक तोटा या दोन पेमेंट प्लॅटफॉर्म्स ना भोगावा लागणार आहे. या धोरणांना पाळण्यासाठी त्यांना काही पर्याय निवडावे लागतील ज्यात ट्रांजॅक्शन्सच्या शेअर नुसार साइन अप लिमिट करणे, व्यक्ती-ते-व्यक्ती ट्रांजॅक्शन्स लिमिट करणे असे काही पर्याय आहेत जे कमी येतील. परंतु हे पर्याय वापरले जातीलच कि नाही याची काही खात्री नाही.
अजून वाचा
…आता WhatsApp वरूनही पैसे करा ट्रान्सफर; जाणून घ्या


