मेष – आज आपण खूप संवेदनशील राहाल. त्यामुळे कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. स्थावर मिळकती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील.
वृषभ – आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल.
मिथुन – थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना मध्यम दिवस आहे. स्नेही आणि मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल.
कर्क – आज भावनांच्या प्रवाहात मश्गुल राहाल आणि कुटुंबीय व स्नेही, नातलग त्यात सहभागी होतील. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल.
सिंह – आज जास्त चिंता आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहण्याचा सल्ला. उक्ती आणि कृती यात संयम राखणे आवश्यक आहे.
कन्या – आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. नोकरी करणार्यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख- शांती लाभेल. पत्नी, मुलगा, वडीलधारे यांचेकडून लाभ होईल..
तूळ – कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचे कौतुक केले जाईल आणि ते आपले प्रेरणास्थान बनतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक – आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद करू नका.
धनु – आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घाला अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे तब्बेत खराब राहील. धन खर्च वाढेल. निषेधार्ह आणि अनैतिक कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा
मकर – विचार आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रां समवेत दिवस आनंदात घालवाल.
कुंभ – आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती आणि सफलता मिळेल असे श्रीगणेश सांगतात. परिवारात ताळ-मेळ चांगला राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आपले विचार आणि व्यवहार यांत हळवेपणा राहील.
मीन – कल्पना विश्वात विचारणा करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखून द्याल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमिक आणि प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. कामुकता जास्त राहील. शेअर- सट्टा बाजारात लाभ होईल.