जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ३७४ कोरोनाबाधित नव्याने आढळून असून तर ४६८ कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
जळगाव शहर-४१, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-४५, अमळनेर-४३, चोपडा-७९, पाचोरा-१५, भडगाव-१५, धरणगाव-०, यावल-३१, एरंडोल-१, जामनेर-८, रावेर-१०, पारोळा-६, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ३७४ रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७११ कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४३ हजार ६५९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ४६७ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ हजार ५८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.