जळगाव, प्रतिनिधी । एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पुर्ततेसाठी २७ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यस्तरावर सुरु असलेल्या “दुखवट्यास ” पाठींबा देऊन भुसावळ आगारातील एस.टी.कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टी, भुसावळ यांच्या वतीने खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या स्वखर्चातून संसारपयोगी किराणा किटचे वाटप करण्यात आले.
एस.टी. महामंडळाच्या तुटपुंज्या व अनियमित वेतनामुळे राज्यातील अनेक एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, त्यात कोरोना नंतर आत्महत्यांमध्ये बरीच वाढ झालेली असून, त्यासाठी आर्थिक मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुरु असलेल्या दुःखवट्याला इतके दिवस उलटूनही राज्य शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. याचा यावेळी भारतीय जनता पार्टी, भुसावळ यांच्यावतीने खेद व्यक्त करण्यात येऊन राज्यतील मविआ सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुखा-दुख:त सहभागी असुन एस. टी. कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याबाबत यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ आमदार मा. संजयभाऊ सावकारे, भाजप तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, मीनाताई लोणारी, प्रा.दिनेश राठी, अजय नागराणी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन, दिलीप कोळी, अनुसूचित जाती शहराध्यक्ष राहुल तायडे, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, गोपीसिंग राजपूत, लोकेश जोशी, सोशल मीडिया शहराध्यक्ष सागर जाधव तसेच कार्यकर्ते व एस.टी.कर्मचारी यावेळी उपस्थित होते.