Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

३५ वर्षीय तरूणाचा खूनप्रकरणी स्थागुशाने संशयितांना केली अटक

by Divya Jalgaon Team
January 28, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
३५ वर्षीय तरूणाचा खूनप्रकरणी स्थागुशाने संशयितांना केली अटक

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा खून केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थागुशाच्या संशयितांना ताब्यात घेतलेले आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर अटकेतील शेख शाबीर शेख सूपडू (वय-३३) आणि शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) दोन्ही रा. श्रीरामपेठ जामनेर ,जळगाव असे दोन्ही संशयित मारेकऱ्यांचे नावे आहे.

याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवर उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याचे गुरूवारी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. मयत शेख गफ्फार याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान सायंकाळी मृतदेहाचे शवच्छेदन केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते.

त्यानुसार गुरूवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा मारेकऱ्यांचा तपासासाठी पोलीस कर्मचारी रवाना झाले होते. यात शेख शाबीर शेख सुपडू (वय-३३) रा. श्रीरापेठ जामनेर याला चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मयत शेख गफ्फार याची पत्नी आणि संशयित आरोपी शेख शाबीर याचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले. दोघांच्या संबंधाबाबत मयत शेख गफ्फार याला समजले होते. यासाठी त्याचा काटा काढण्यासाठी संशयित आरोपी शेख शाबीर शेख सपडू याने सहकारी शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) रा. श्रीरामपेठ जामनेर यांनी कारने येवून २६ जानेवारी सायंकाळी शहरातील सुभाष चौकातून उचलले.

त्यानंतर कारमध्ये घेवून ममुराबाद रोडवर सुतीच्या दोरीने गळफास देवून ठार केले. पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, जितेंद्र पाटील, अश्रु शेख निजामोद्दिन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, रणजित जाधव, किशोर राठोड, राहूल पाटील, अविनाश देवरे, श्रीकृष्ण देशमुख, विजय पाटील, संतोष मायकल, विनोद पाटील, ईश्वर पाटील, राजेंद पवार, भारत पाटील, अशोक पाटील, दर्शन ढकणे यांनी कारवाई करत दोन्हीसंशयितांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या ८ तासात अटक केली आहे.

Share post
Previous Post

भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातीची राहत्या घरात आत्महत्या

Next Post

अयोध्यानगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान

Next Post
अयोध्यानगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान

अयोध्यानगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group