Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

by Divya Jalgaon Team
January 21, 2022
in जळगाव, सामाजिक
0
कांताबाई जन्म जयंती निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वितरण

जळगाव  – ‘अडचणीत असलेल्यांना आपल्या स्वतःलाच अडचणी सोडवाव्या लागतात, परंतु अशा व्यक्तींना आपल्यापरीने मदत करणे म्हणजे त्याचे दुःख कमी करणे होय, अशी मदत करणे भाग्याचे काम असते अशी शिकवण आई कांताई यांनी आम्हाला दिली. जैन इरिगेशनच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना ‘स्नेहाची शिदोरी’ नक्की उपयोगी ठरेल’. असे मत जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते कांताबाई जैन यांच्या 84 व्या जन्म जयंती आणि कांताई नेत्रालयाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. (ज्यात महिनाभर पुरेल इतक्या किराणा मालाचा समावेश आहे) यावेळी ते बोलत होते. छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. अंतरिक्ष महातो, डॉ. डॉली रणदिवे, एसटी कर्मचारी विजय पाटील उपस्थित होते.
आरंभी कांताबाई जैन यांच्या स्मृतींना मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहाच्या शिदोरी उपक्रमाबाबत सांगितले. यावेळी अभय जैन, डॉ. अंतरिक्ष, डॉ. रणदिवे, अमर चौधरी, अनिल जोशी, किशोर कुळकर्णी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्नेहाची शिदोरी वितरीत करण्यात आली. अमर चौधरी यांनी कांताई नेत्रालयाच्या सहा वर्षांच्या प्रगती व केलेल्या कार्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. शिदोरी घेणाऱ्या कुटुंबियांच्या वतीने श्रीमती यशोदा पांढरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी श्रद्ध्येय मोठे भाऊ भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Share post
Tags: #anil joshi#Jain Irriagation#kantai#social work jain irriagationDivya Jalgaon
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २१ जानेवारी २०२२

Next Post

आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे ;प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार

Next Post
आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे ;प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार

आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे ;प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group