जळगाव (प्रतिनिधी) – महिलांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन क.ब.चौ.उ.म.वि.चे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांनी आज केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवावस्ती विभाग व विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या बेसिक व अॅडव्हांस शिवणकला प्रशिक्षण अभ्यासवर्गाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ. मनिष जोशी, स्थानिक नगरसेविका पार्वताबाई भिल, सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ विवेक जोशी, प्रकल्प सहप्रमुख मनिषा खडके उपस्थित होते.
आज दि.२० जानेवारी २०२२ रोजी सेवावस्ती विभाग, हरी विठ्ठल नगर येथे दुपारी १ वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. भरत अमळकर यांनी अध्यक्षिय मनोगतात उपस्थित महिलांना आश्वस्त केले कि, विधायक उपक्रमा साठी केशवस्मृती प्रतिष्ठान सोबतच विद्यापीठ प्रशासन सोबत असून महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता व्यवसाय वृद्धीचा मार्ग स्विकारला पाहिजे असल्याचे सांगितले. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा खडके यांनी तर सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, राधिका गरुड, मंगला अहिरे, कांचन सांगोळे, किशोर गवळी यांनी परिश्रम घेतले.